Posts

Showing posts from May 30, 2020

मी आणि माझ्या खिडक्या

Image
मी लहानपणा पासुन अनेक खिडक्या बघितल्या आहेत आणि प्रत्येक खिडकी आपपल्या पद्धतीने जगत असते. काही खिडक्या असुनही नसल्या सारख्या असतात. भिंती मध्ये जागा आहे म्हणून केलेल्या असतात. काही खिडक्या त्या वास्तूचं प्रतिबिंब असतात. मी एकलहऱ्याच्या ज्या घरात राहायचे त्या घरात तीन खिडक्या होत्या. पण त्यात एक खिडकी खूप विशेष होती. त्या खिडकी मधुन बाहेरच्या गॅलरी मध्ये जाता यायचं. खेळण्याचं मैदान असावं इतकी मोठी तर गॅलरी होती. ही खिडकी नेहमी अर्धी बंद असायची, उरलेल्या अर्ध्या खिडकी मधुन एक आख्खा माणूस बाहेर जाऊ शकायचा. त्यामुळे ही खिडकी खूप adventures करणारी होती. त्या खिडकी मधुन खाली उतरतांना खाली एक पायरी होती. लहानपणी पायरी वर पाय टेकले नाहीत की खिडकी वरून सरपटतत खाली हळू हळू पाय ठेवायचे. मग पायरी पायाला लागायची. तशी एकलहऱ्याची खिडकी helpful होती.  मी लग्न होऊन फ्लॅट मधून लालबागच्या चाळी मध्ये राहायला गेले. चाळीचा स्वभाव बिल्डिंगच्या स्वभावापेक्षा खूप वेगळा होता. बिल्डिंग अंतर्मुख होती. शांत होती. चाळ खूप बोलकी होती. चाळी मध्ये सगळे एकमेकांना आणि एकमेकांच्या दूरच्या- जवळच्या नातेवाईकांना ओळखणार...

गोरख न्हावी

आज LOCKDOWN च्या निमित्ताने आमच्या घरी केस कापायचा एक अध्याय पार पडला आहे आणि हा अध्याय मला परत एकदा मला आठवणी मधल्या एकलहऱ्याला घेऊन गेला आहे. इक्बाल मामा च्या बेकरीच्या बाजुला ४-५ दुकान सोडून गोरख न्हाव्याच दुकान होत. तिकडे आम्ही केस कापायला जायचो. मी आणि तुषारने  (माझा मामे भाऊ) ज्या अनेक गोष्टी CHILDHOOD ADVENTURE मध्ये केल्या आहेत, त्यात गोरख न्हाव्याने केलेला HAIRCUT पण होता. आमचे केस सारखेच वाढतात असं कोणीतरी म्हणायचे मग आम्हाला ५ रुपये देऊन गोरख न्हाव्याकडे पाठवलं जायचं. ५ रुपये एका HAIRCUT  चे होते की तुषार चे आणि माझे मिळुन हे मला सांगता येणार नाही.  मी आणि तुषार HAIRCUT ला एकटेच जायचो, इतकं INDEPENDANT आम्हाला तेव्हाच करण्यात आलेलं होती. गोरख न्हाव्याकडे जाण हे जत्रेमधल्या पाळण्या मध्ये बसण्या सारखं होतं. मज्जा पण यायची, जायचं पण असायचं आणि भिती पण वाटायची. गोरख न्हाव्याच्या दुकानात आकाशी रंगाच्या खुर्च्या होत्या. उंची वाढविण्या साठी एक गोलाकार उशी होती. त्याच्यावर बसायला खूप मज्जा यायची आणि HAIRCUT मधला हा एकदम EXCITED पार्ट होता. पण अशी एकाच उशी असल्यामुळे एक...

पॉझिटिव्ह माणसांची खरी गोष्ट : पदमा मावशी

Image
कबीर बाय अबिदा च्या introdution मध्ये गुलजार साहेब म्हणतात, सुफियो संतो के यहाँ मौत का तस्सवुर बडे खुबसुरत रूप लेता है। झुम उठते है, जी उठते है। तरह तरह से अंत आनंद की बात करते है। पदमा मावशी हे माझ्या (आणि माझ्या सारख्या अनेकांच्या) आयुष्यातलं एक सुरेल पर्व आहे. (मी या व्यक्ती वर खरं तर एक पुस्तक लिहू शकते ) मी ४-५ वर्षाची असतांना मुंबई मध्ये आले आणि बुधवारच्या, तिच्या घरी होणाऱ्या सत्संग मध्ये पदमा मावशी मला भेटली. आणि आयुष्यभर पुरेल अशी friend, philosopher and guide झाली. खूप सुंदर नव्हती पण तेजस्वी होती. सावळी होती, पण बोलकी होती. आणि बोलणं कोणालाही काही क्षणांत आपलं बनवुन टाकेल असं! तिच्या घरी खूप मेहफिली रंगल्या. ती गायला लागली की तिच्या सुरांबरोबर एका वेगळ्या जगात घेऊन जायची. तिने गायलेली गाणी मी दुसऱ्या कोणत्याही कसलेल्या गायिकेकडुन ऐकली तरी, त्यांना मावशीच्या गाण्याची सर येत नाही. तिचं गाणं आत्म्यांपासून निघायचं आणि म्हणून ते भिडायचं. तिचं- माझं नातं रक्ताचं नव्हतं पण आत्म्याचं आणि आत्मीयतेचं होतं. मावशीने गाण्याबरोबर खूप प्रेम दिल. तिने जर तिच्या मुलांना दिवाळीला कपड...

पॉझिटिव्ह माणसांची खरी गोष्ट : शशी आँटी जी आणि प्रकाश जोशी जी

Image
आज प्रकाश जोशींची आणि शशी आँटी जी यांच्या लग्नाचा वाढदिवस. प्रत्येकाला आपापले हे दिवस खूप खास वाटत असतात. पण प्रकाशजींनी मला इतरांचे दिवस कसे खास कसे करायचे हे शिकवले आहे. आत्ता कुणी कुणाचे वाढदिवस लक्षात ठेवतं नाही, किंवा लक्षात ठेवायची गरज त्यांना भासतं नाही. फेसबुक किंवा वॉट्स अँप ओपन केलं की कोणाचा वाढदिवस आहे, लग्नाचा वाढदिवस आहे हे आपोआप कळतं. मग आपण हैप्पी बर्थडे आणि २-३ smileys पाठवल्या की आपण शुभेच्छा पाठवण्याचं कर्तव्य केलेलं असतं. (बरेच लोक तर वरचा मेसेज कॉपी करून खाली पेस्ट करून पण शुभेच्छा पाठवतात.) पण प्रकाशजींच्या शुभेच्छा खूप विशेष असतात. गेल्या २५-३० वर्षांत (जेव्हा फेसबुक आणि वॉट्स अँप remind करायला नव्हतं तेव्हा पासुन) प्रकाशजी माझ्या प्रत्येक वाढदिवसाला मला विश करतात. आणि फक्त मलाच नाही तर माझ्या घरातल्या प्रत्येक व्यक्तीला प्रकाशजींचा वाढदिवसाला फोन येतो. (माहेरी आणि सासरी सुद्धा ) मला त्यांचा फोन येत नाही तो पर्यंत वाढदिवस साजरा झाल्याचं समाधान मिळत नाही. एके वर्षी माझ्या वाढदिवसाला प्रकाशजी हिमाचल प्रदेश मध्ये टूर ला गेले होते, landline चा जमाना होता. फोन लागत नव...

पॉझिटिव्ह माणसांची खरी गोष्ट : सुजाता आणि सुहास पाटील

Image
सुरवात सुहास पाटील या पासुन.. हा मला भेटलेला अत्यंत विचित्र माणुस आहे, तरी हा माझा शाळेच्या दिवसांपासूनचा मित्र आहे. हा मला कोणत्या वर्षी भेटला ते मला सांगता येणार नाही. पण वार नक्की बुधवार होता, कारण हा मला पदमा मावशीच्या घरी होणाऱ्या सत्संग मध्ये भेटला होता. सत्संग संपल्या वर आम्ही बाल्कनी मधल्या उंबरठ्यांवर ''डोंगर का पाणी'' खेळायचो. मग हा माझ्या शाळेत असल्याचं कळलं आणि शाळेत याचं सारखं दर्शन होऊ लागलं. कारण, सुहास ला सारखं वर्गाच्या बाहेर उभं केलं जायचं. त्याचं कारण त्याची न संपणारी बडबड असावी. (सुहास पाटील हा मनुष्य प्राणी आजही continue बोलतो. त्या मध्ये स्वल्प विराम, अल्प विराम, पूर्ण विराम काहीच नसतं. हा व्यक्ती सलग बोलतो. ) वर्गाच्या बाहेर उभं असल्यावर एखाद्या मुलाच्या चेहऱ्यावर जो अपराधी भाव असायला हवा. तो याच्या चेहऱ्यावर कधीच आला नाही. साधारण माणसांचे बरेच गुण या व्यक्ती मध्ये नाहीयेत. आजही त्याच्या माझ्या संभाषणातल्या ८०% वेळा मी त्याला, तुला शिस्त कशी नाहीये, आणि तू कसं सुधारायला पाहिजे आणि कमी बोलायला पाहिजे हे त्याला समजावत असते. बऱ्याच वेळा ओरडत असते. ...

पॉझिटिव्ह माणसांची खरी गोष्ट : ती (जिचं नावं मला माहीत नाही)

लग्न झाल्यानंतर मी आणि संदेश केरळला फिरायला गेलो होतो. मी संदेश च्या जितक्या प्रेमात पडले, तितक्याच केरळच्याही पडले. आणि परत एकदा केरळ बघायला जायचं असं मी मनात ठरवलेलं होत. जागु, सचिनजी आणि आम्ही एकत्र फिरायला जायचे प्लॅन करत असतांना, मी सगळे लोकशन्स कॅन्सल करून केरळलाच जाऊया असं सांगितलं. ऑक्टोबर मध्ये जायचं ठरलं २ महिने आधी सगळे बुकिंग्स झालेले होते. काय शॉपिंग करायचीय आणि काय कुठे खायचंय हे पण ठरलेलं होतं. पण जायच्या १ दिवस आधी अदवितला (माझा मुलगा) ताप आला. आम्ही सकाळी रेग्युलर डॉक्टर कडे घेऊन गेलो. त्यांनी अजून २-३ दिवस बघा नाहीतर केरळ मध्ये ब्लड टेस्ट करून घ्या, असं सांगितलं. आम्ही केरळ ला पोहचलो आणि दोन दिवस फिरलो पण रात्रीचा येणारा ताप माझी आणि संदेश ची झोप उडवत होता. आम्ही असलेले मेडिसिन्स देतं होतो , बर्फाच्या पाण्याने sponging सगळं करत होतो. शेवटी तिसऱ्या दिवशी आम्ही टेकडी नावाच्या हिल स्टेशनला जायला निघालो. रस्त्यात एखादा child specialist असेल तर दाखवु असं ठरवुन निघालो. शंकेची पाल मनात चुकचुकत होतीच! रस्त्यात एक डॉक्टर भेटले. त्यांनी ब्लड टेस्ट करायला सांगितलं. ब्लड टेस...

पॉझिटिव्ह माणसांची खरी गोष्ट : गोपीराज मामा

Image
स्थळ : माझं आवडतं एकलहरे, मार्केट बिल्डिंग, पहिला मजला, माझ्या आज्जीची गजबजलेली खानावळ. जेवणारे, जेवण बनवणारे, वाढणारे, यांच्या सोबत मित्र परिवार, नातेवाईक सगळ्यांचा राबता होता. त्यात एक गोपीराज मामा होता. मम्मीचा चुलत भाऊ. मध्यम बांधा, ऊंची बेताची, शर्टाची इन् आयुष्यात कधीच केलेली नसावी, विरळ मिशी, चेहऱ्यावर मिश्किलतेची छटा. सायकलवर बसुन यायचा तेव्हा, हॅन्डल च्या दोन्ही बाजूंना खानावळीच्या डब्ब्यांच्या पिशव्या अडकवलेल्या असायच्या. गोपीराज मामा आजीच्या खानावळीचे डब्बे पोहचवायचा. त्याच्या मराठी भाषेला अहिराणीचं वळण होतं. तो जिथे उभा राहायचा, तिथे हशा पिकायचा. एकदा आम्ही ढोकळे खात होतो. तर मामा म्हणाला की, ''कमी खा, नाही तर उद्या ठोकळे बाहेर येथील.'' एकदा आमचे आजोबा वारले म्हणून सगळ्या मामांनी टक्कल केले होते. २-३ दिवसात सगळ्याच्या टकलांवर थोडी थोडे केस दिसु लागले. मामाने तेव्हा 'सगळ्यांच्या डोक्यावर बाजरीच्या भाकरी थापल्या सारख्या वाटतं' असं म्हणुन सगळ्यांना हसवलं होतं. मामा मजेशीर होता. मज्जेमज्जेत त्याला २ मुलं आणि २ मुली झाल्या. सगळ्यात छोटा विवेक वर्ष भराचा...

पॉझिटिव्ह माणसांची खरी गोष्ट : किसन माळी जी (नाना)

Image
नाना - काही माणसं आपल्याचं जगातली असतात तरी ती आपल्या आपल्या जगातली नसतात. नाना असे विलक्षण होते. कर्मठ सेवादार, सत्गुरू वरचा विश्वास चेहऱ्या वरच्या हास्यात सामावलेला होता. भेटणाऱ्याला पहिले नानांची एक थाप पाठीवर आधी भेटायची आणि मग नाना भेटायचे! पण ती थाप आपुलकी बनवुन जायची. माझं लग्न झाल्यानंतर, गोपी अँड पार्टी मधल्या ज्या शेकडो कुटुंबांचं मिळून माझं कुटुंब झालं, त्यातले किसन माळीजींचे कुटुंब आहे. अनेक वर्ष समागम सुरु होण्याच्या आधी ते तयारीत दिसत रहायचे. सेवेत व्यस्त आणि हरिनामात व्यस्त! असे. जवाबदाऱ्या होत्या पण त्या सत्गुरुच्या आधारावर पेललेल्या, त्यामुळे त्यांचं ओझं झालं नाही. मी त्यांना कधीही घाई गडबडीत बघितलं नाही. संत होते, संथ होते, सहज होते. आम्ही सहकुटुंब त्यांच्या मुलाच्या लग्नाला गेलो होतो. आम्ही लग्नाला गेल्याच्या आनंद त्यांच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत होता. आम्हाला कुठे ठेवू आणि कुठे नको असं त्यांना झालं होतं. 'गुरसिख नु जद गुरसिख मिलदा वेख के चाह चढ जांदे ने' ते मला त्या दिवशी अण्णा आणि त्यांच्या भेटीला बघून वाटलं. आम्ही निघालो तेव्हा त्यांचा मुलगा अण्णाना मि...

पॉझिटिव्ह माणसांची खरी गोष्ट : इक्बाल मामा

Image
मी माझ्या लहानपणीची, पहिली ४-५ वर्ष नाशिक मधल्या एकलहरे नावाच्या सुरेख ठिकाणी घालवली आहेत. औष्णिक विद्युत केंद्र असल्याने engineers ना राहण्यासाठी ही कॉलनी वसवली गेली होती. तिथे एक मार्केट बिल्डिंग होती. त्यात पहिल्या मजल्या वर माझ्या आजीची खानावळ होती. फॅमिली त्या खाणावळीतच राहायची. जेवायला येणारे, सगे सोयरे, नातेवाईक यामुळे घर नेहमीच भरलेलं असायचं. त्यातच इक्बाल मामाचं माझ्या सख्या मामा चा मित्र म्हणून घरी येण जाण होतं. खाली सगळं मार्केट! सगळे मार्केट वाले, दुकान वाले, भाजी वाले ओळखीचे. (आज मुंबई मधल्या फ्लॅट मध्ये जिथे कोणीच कोणाला फारसं ओळखत नाही, तिथे ही गोष्ट मला विशेष वाटते). त्या सगळ्या मार्केट मध्ये माझी एक favourite जागा होती. आमच्या बिल्डिंग च्या exact समोरची - इक्बाल बेकारी अँड जनरल स्टोर. आणि हे दुकान होतं आपल्या इक्बाल मामाचं. त्याच्या काउंटर वर ८-१० स्वच्छ बरण्या. त्या मध्ये रंगीत लिम्लेट च्या गोळ्या, चौकोनी आणि छोटी बटण बिस्किटं. थोड्या मोठ्या बरण्यां मध्ये मेलडी चोकोलेट्स. (मी कदाचित या दुकानात इतके मेलोडी खाल्ले आहेत की, आज पण जर मला कुठेही मेलोडी दिसलं तर बॅकग्राऊंडल...

पॉझिटिव्ह माणसांची खरी गोष्ट : मृणाल घोसाळकर ( मुन्ना )

Image
मृणाल घोसाळकर (मुन्ना) ही मॉडर्न जगातील अल्ट्रा मॉडर्न मुलगी आहे. हे पात्र मला १२-१३ वर्षांपूर्वी भेटलं. माझी आई आणि मृणालची आई (सुनीता मावशी) शाळेपासुनच्या मैत्रिणी आहेत. त्याच्या काळात वॉट्स अँप फेसबुक नसल्यामुळे, त्या दोघींना एका शहरात एकमेकींना सापडल्याचा दैवी आनंद झाला होता. त्या आनंदाच्या काळात मृणाल सुनीता मावशी बरोबर घरी आली. माझ्या पेक्षा काही वर्षांनी लहान होती. गोंडस चेहरा, अत्यंत बोलके डोळे, थोडस smile करण्यापेक्षा तिला खदखदुन हसता येतं आणि तिला ते शोभतं. तेव्हा ती कॉलेज मध्ये MSC करत होती. माझे आणि ऋतीचे (माझी लहान बहीण) अनेक COMMAN फ्रेंड्स आहेत त्यात मुन्ना नकळत सामील झाली. आपल्याला गरज पडली तर एका हाकेवर काही लोक आपल्या साठी उभे राहतात, माझ्या जवळच्या अश्या लोकांमधली मृणाल आहे. मुन्नाला (कॉलेज मध्ये असतांना) एके दिवशी रस्त्यावर एक मांजरीचे पिल्लु जखमी सापडले मग मुन्नाने त्याला घरी आणलं. त्याला बरं केलं आणि अजूनही गेली अनेक वर्ष ते मुन्नाचं फॅमिली मेंबर आहे. त्या माऊला बरं नसेल तर मुन्ना ला आपलं मूल आजारी असल्या इतकं टेन्शन असतं. मला फारसं प्राण्यांचं वेड नसल्याने मुन्...