Posts

Showing posts from July 1, 2020

पॉझिटिव्ह माणसांची खरी गोष्ट : निमाई

Image
प्रत्येक व्यक्तीच्या जडणघडणी मागे त्या व्यक्तीच्या आई आणि वडिलांचा मोठा सहभाग असतो. माझ्या जडणघडणी मध्ये आई आणि मावशीचा सहभाग आहे. नीमा मावशी - अत्यंत सुंदर चेहरा, कर्तव्यनिष्ठ आई. नीटनेटकेपणा आणि टापटीपपणा तिच्या प्रत्येक कामा मध्ये दिसून येतो. परिस्थितीचे अनेक काटे तिला कमी वयात टोचतं राहिले आले आहेत, पण माझ्या वाट्याला फुलं यावीत यासाठी तिने जीवाचं रान केलं आहे. ती १७ वर्षाची असतांना काका पदरात दोन मुलं( एक मुलगा दीड वर्षाचा - दुसऱ्यासाठी ती गरोदर ) आणि असंख्य प्रश्न तिच्या पदरात टाकून गेले. पण ती पदर खोचुन उभी राहिली. काकांची येणारी तुटपुंजी पेन्शन आणि तिला येणारं शिवणकाम यावर तिने एका मुलाला इंजिनिअर आणि दुसऱ्या मुलाला MBA केलं. खरं तर आपल्या ताटात २ चपात्या असतांना अर्धी दुसऱ्यांना देणं, यासाठी मोठं धैर्य लागत नाही. पण आपलं पोट भरण्याचा प्रश्न समोर असतांना आपण दुसऱ्याचा विचार करावा यासाठी जे मोठं मन लागतं, ते मावशीचं आहे. मी ४-५ वर्षाची असतांना मावशी मला शिक्षणासाठी मुंबई ला घेऊन आली. दोघे दादा शिकायचं होते. महिन्याच्या शेवटी शेवटी तर घरात अजिबातच पैसे उरायचे नाहीत. तरी तिने तिच्...