पॉसिटीव्ह माणसांची खरी गोष्ट : आई
अनेक नाती जगतांना भेटतात. जिव्हाळ्याने जपली तर दूरपर्यंत साथ निभावतात. पण एक नातं जे नेहमी बदनामच राहतं, पण माझ्या साठी पुण्याई घेऊन आलं. सासू सुनेचं नातं. जर जगात बेस्ट सासू अवॉर्ड कंपेटिशन असेल तर मी आईना nominate करू शकते. नाव - अरुणा बामुगडे. शिक्षण फारसं नाही पण मॉडर्न आहेत विचारांनी. कमालीच्या देखण्या आहेत, चेहऱ्यानेच नाही तर मनानेही ! सतगुरु वर पूर्ण विश्वास आणि आध्यात्मिकता नसा नसात भिनलेली, सतगुरू पेक्षा दुसऱ्या कशालाही प्रायॉरीटी आजपर्यंत दिलेली नाहीये यांनी, म्हणून त्या जगापेक्षा वेगळ्या सासू आहेत. सासू म्हणून insecurity, मुलावर गाजवणारा हक्क या पैकी कोणताही typical सासु गुण त्यांच्या ठायी नाही. मी लग्न करून या घरी आले तेव्हा मला जेवणातलं काही बनवता येत नाही म्हणून त्या कदाचित थोड्या नाराज असतीलही, पण त्यांनी ते मला कधीही जाणवु दिल नाही. मी अळणी, खारट,कच्च पक्क जे काही बनवलं, ते त्यांनी आवडीनं खाल्लं. तू शिकते आहेस ना मग हरकत नाही, असं म्हणत राहिल्या मग मी महिन्या भरात स्वयंपाक शिकले. आईंनी प्रत्येक पदार्थाचं तोंड भरून कौतुकच केलं. त्यांचं आणि माझं कामाचं timetable कध...