पॉझिटिव्ह माणसांची खरी गोष्ट : वर्षा ताई
परिस्थितीच्या धगी मध्ये तावून सुलाखुन निघाल्यावर काही माणसं सोन्या सारखी चमकु लागतात, तशी 'वर्षा ताई' आहे. सावळी तरी उज्ज्वल, बेताची उंची, सगळ्या संकटांवर मात करून त्यांना smile मध्ये सामावण्याचं सामर्थ्य... खुप stylish नसली तरी नेटनेटकी आहे. नुसती चालतं नाही, डोलतं चालते. तिच्या मध्ये एक लगबग आहे. सतत ट्रेन पकडायला निघाल्यासारखी स्पीड मध्ये असते. डोक्यात अनेक एका वेळी अनेक गोष्टी असतात. सहजता तिच्या स्वभावाचा असा भाग आहे, जो मला खुप भावतो ! वर्षा ताई माझी सख्खी नाही पण, आमच्या मध्ये जे आहे त्याला 'सख्खेपण' म्हणतात. २ महिन्यांपूर्वी भारत आणि रशिया मध्ये एक करार झाला. भारताची representative म्हणुन ताई त्या करारावर singature करायला गेली. वर्षा ताई RBI मध्ये काम करून RBI चं भलं करते आहे. पण कुठलाही बडेजाव नाही. पदाचा अहंकार नाही. हल्ली कॉर्पोरेट मध्ये attitude या शब्दाखाली जो arrogance दाखवला जातो, त्याचा स्पर्श ताईला झालेला नाहीये. मी excited होऊन फोन केला तर मला म्हणाली की, ''RBI ने ठरवलं की कोणी पण जाऊ शकतं, इतकं काही खास नाही.'' मी म्हटलं की,'' ...