तुझे देणे आहे
आजवर मला जे जे मिळाले, ते ते तुझे देणे आहे. तूच देऊ शकते जगती, म्हणुन तुझ्याकडे मागणे आहे. किती अविरत किती निरंतर, तुझा माझ्या अवतीभोवती वावर. माझ्या प्रत्येक उच्छवासासोबत, तू पुढचा श्वास करतेस हजर. श्वास दिलेस तर श्वासांची करता येऊ देत कदर अवघ्या मानवांसाठी मागते, निरंकार बघण्याची नजर तक्रारीचे सूर सोडून आत्ता आभाराचे गाणे दे जगातल्या प्रत्येक चोचीला पोटभर तू दाणे दे वादळामध्येही झाडावरची घरटी कुठे खाली पडतात? आम्ही पडण्याआधी तुझे हात आम्हा अलगद झेलतात वादळांमध्येही तुझा विश्वास दे स्थिरता जगण्यास दे सहज असतील, सहज बनवतील अशा संतांचा सहवास दे दुर्गुणांना सुबुद्धी दे प्रेमामध्ये वृद्धी दे संकटे आली तरीही नीती मध्ये शुद्धी दे रात्री नंतर दिवस देतोस तसा सर्वाना ज्ञानप्रकाश दे एकमेकांना जोडणारे तू प्रेमाचे पाश दे अपराधी असले तरी मी तुझीच आहे दाता तू भक्तवत्सल आहेस म्हणुनी, आत्ता क्षमेचे दान दे तुझ्या मर्जीत राहण...