पॉझिटिव्ह माणसांची खरी गोष्ट : मृणाल घोसाळकर ( मुन्ना )
मृणाल घोसाळकर (मुन्ना) ही मॉडर्न जगातील अल्ट्रा मॉडर्न मुलगी आहे. हे पात्र मला १२-१३ वर्षांपूर्वी भेटलं. माझी आई आणि मृणालची आई (सुनीता मावशी) शाळेपासुनच्या मैत्रिणी आहेत. त्याच्या काळात वॉट्स अँप फेसबुक नसल्यामुळे, त्या दोघींना एका शहरात एकमेकींना सापडल्याचा दैवी आनंद झाला होता. त्या आनंदाच्या काळात मृणाल सुनीता मावशी बरोबर घरी आली. माझ्या पेक्षा काही वर्षांनी लहान होती. गोंडस चेहरा, अत्यंत बोलके डोळे, थोडस smile करण्यापेक्षा तिला खदखदुन हसता येतं आणि तिला ते शोभतं. तेव्हा ती कॉलेज मध्ये MSC करत होती. माझे आणि ऋतीचे (माझी लहान बहीण) अनेक COMMAN फ्रेंड्स आहेत त्यात मुन्ना नकळत सामील झाली. आपल्याला गरज पडली तर एका हाकेवर काही लोक आपल्या साठी उभे राहतात, माझ्या जवळच्या अश्या लोकांमधली मृणाल आहे.
मुन्नाला (कॉलेज मध्ये असतांना) एके दिवशी रस्त्यावर एक मांजरीचे पिल्लु जखमी सापडले मग मुन्नाने त्याला घरी आणलं. त्याला बरं केलं आणि अजूनही गेली अनेक वर्ष ते मुन्नाचं फॅमिली मेंबर आहे. त्या माऊला बरं नसेल तर मुन्ना ला आपलं मूल आजारी असल्या इतकं टेन्शन असतं. मला फारसं प्राण्यांचं वेड नसल्याने मुन्नाचं मांजरप्रेम मला तेव्हा खास वाटलं नव्हतं.
पण मग वर्ष उलटली. आम्ही मोठ्या झालो, तसचं मुन्नाचं मांजरप्रेम मोठं झाल्याचं लक्षात आलं. आता मुन्ना चक्क बिबट्यांच्या प्रेमात आहे आणि बिबट्यांच्या संवर्धना साठी मुन्ना काम करतेय. मुन्ना Environmentalist आहे. कोरोनामुळे अचानक सगळ्यांना निसर्ग, पशु, पक्षी दिसु लागले आहेत. पण मुन्ना गेली अनेक वर्षे जीव पणाला लावुन यासाठी काम करतेय. ( मी स्वतः मुंग्यांची रांग, झुरळं, पाल, मांजर, कुत्रे अश्या आजूबाजूच्या सगळ्या प्राण्यांना घाबरते. रस्त्याने जातांना समोरून कुत्रा
दिसला, तरी मी रास्ता cross करून जाते.) म्हणून मुन्ना मला खूप शूर असल्या सारखं वाटतं राहतं.
२-३ वर्षांपुर्वी मृणाल अचानक घरी आली. इतकी गोरीपान मुलगी इतकी काळीकुट्ट कशी काय झाली? या प्रश्नाचं उत्तर असं आहे की, मृणाल कोणत्या तरी जंगला जवळच्या धनगरांच्या घरात (झोपडीच असावी ) राहत होती. जंगलात मेंढ्या चरायला नेणारे धनगर आणि बिबट्या यांचे प्रश्न सोडवण्यासाठी हे मृणाल करत होती. ते काम संपवुन मुन्ना परत आली तरी आजही ती त्या फॅमिलीच्या contact मध्ये आहे. कारण मुन्ना माणूस म्हणुन पण खूप संवेदनशील आहे. तिकडची छोटी मुलं फक्त दोनचं कपड्यांचे जोड वापरतातं. म्हणुन मृणालला आपल्या जगण्याच्या गरजा कमी झाल्या सारखं वाटलं आणि मग समाधानी राहून ती अजुन काम करते आहे.
जिथे आजकालच्या मुलींना (including me) latest fashion ट्रेंड्स कोणते असे प्रश्न पडतात. तेव्हा मृणाल ला जगात किती हॉर्नबिल उरले आहेत (हा एक जगातुन लोप पावत जाणारा पक्षी आहे, असे मुन्नाने सांगितलंय) असे प्रश्न सतावतात. त्यांच्या संवर्धनासाठी मुन्ना आसाम, नागालँड आणि तिकडच्या जंगलात जाऊन काम करत होती.
आपल्या फोन मध्ये आपले सेल्फी आणि आपल्या गोतावळ्याचे फोटोस असतात ना, तसे मुन्नाच्या मोबईल मध्ये बिबट्यांचे फोटोस असतात. त्यांच्या कॉलर मध्ये लावलेल्या GPS चिप्स मुळे बिबट्यांचा लोकेशन ट्रॅक करता येतं. मनुष्य वस्ती जवळ बिबटे आले की आपण घाबरतो ना आपल्या जीवासाठी? आणि मुन्ना हळहळते त्या मुक्या जनावरांसाठी! ज्याला आपल्या सिमेंटच्या जंगलामुळे आपण भुकेलं ठेवलं आहे. मृणाल मुंबई सारख्या शहरामध्ये मोठी झालेली, एखाद्या कॉर्पोरेट ऑफीस मध्ये बसु शकली असती, पण ती त्यात रमली नाही. तिला जाणवणाऱ्या मुक्या प्राण्याच्या प्रेमाने तिला बसु दिलं नाही. मृणाल वेगवेगळ्या खेड्या पाड्यांवर जाऊन जनजागृती करतेय. शाळेतल्या मुलांना training देतेय.
काम आणि करियर सगळेचं करतात. पण खूप कमी लोकांना त्यांचा passion सापडतं. मुन्नाचं passion स्वतः पेक्षा दुसर्यांना वाचवण्याचं आणि जगवण्याचं आहे. कोरोना नंतर बदललेल्या जगात मुन्ना आणि तीच काम खूप मोठं आणि महाग आहे, हे सगळ्यांना कळेलचं. पण मुन्ना, तू जगावेगळी आहेस ! खुप special आहेस आणि माझी आहेस याचा मला सार्थ अभिमान आहे !




Comments
Post a Comment