मी आणि माझ्या खिडक्या
मी लहानपणा पासुन अनेक खिडक्या बघितल्या आहेत आणि प्रत्येक खिडकी आपपल्या पद्धतीने जगत असते. काही खिडक्या असुनही नसल्या सारख्या असतात. भिंती मध्ये जागा आहे म्हणून केलेल्या असतात. काही खिडक्या त्या वास्तूचं प्रतिबिंब असतात. मी एकलहऱ्याच्या ज्या घरात राहायचे त्या घरात तीन खिडक्या होत्या. पण त्यात एक खिडकी खूप विशेष होती. त्या खिडकी मधुन बाहेरच्या गॅलरी मध्ये जाता यायचं. खेळण्याचं मैदान असावं इतकी मोठी तर गॅलरी होती. ही खिडकी नेहमी अर्धी बंद असायची, उरलेल्या अर्ध्या खिडकी मधुन एक आख्खा माणूस बाहेर जाऊ शकायचा. त्यामुळे ही खिडकी खूप adventures करणारी होती. त्या खिडकी मधुन खाली उतरतांना खाली एक पायरी होती. लहानपणी पायरी वर पाय टेकले नाहीत की खिडकी वरून सरपटतत खाली हळू हळू पाय ठेवायचे. मग पायरी पायाला लागायची. तशी एकलहऱ्याची खिडकी helpful होती.
मी लग्न होऊन फ्लॅट मधून लालबागच्या चाळी मध्ये राहायला गेले. चाळीचा स्वभाव बिल्डिंगच्या स्वभावापेक्षा खूप वेगळा होता. बिल्डिंग अंतर्मुख होती. शांत होती. चाळ खूप बोलकी होती. चाळी मध्ये सगळे एकमेकांना आणि एकमेकांच्या दूरच्या- जवळच्या नातेवाईकांना ओळखणारे होती. एका मजल्यावर सुमारे ४० बिऱ्हाडं होती. पण त्या सगळ्याची मिळून एक खिडकी होती. दगडी बांधकाम असलेल्या या चाळीत जिने आणि खिडकी जुन्या लाकडी पद्धतीचे होते. लालबागची खिडकी अनुभवी जुन्या बाई सारखी होती. मुलींना बॉय friend बरोबर फोन वर बोलण्यासाठी, सुनांना माहेरी फोन करण्यासाठी ही खिडकी मदत करायची. (ही खिडकी जर कधी बोलायला लागली असती तर तिला सगळ्या चाळीचे सेक्रेटस माहीत होते.) मुलांना घरात करमत नसेल तर खिडकी बसायची जागा होती. मला चपात्या करून घामाच्या धारा आल्या कि हवा खायची जागा ही खिडकी होती. लालबागची खिडकी तिकडच्या माणसांसारखी हौशी होती. दहीहंडीला तिच्या वरून खालचा नजरा बघण्यासाठी सगळे आळीपाळीने उभे राहायचे. गणपती मध्ये तर ही १० दिवस जगायची. गंमत दाखवायची. आता हि खिडकी रिन्यू व्हायला गेली आहे. makeover केलेली ही खिडकी कशी दिसेल कोणास ठाऊक?
आत्ता ठाण्याच्या घराला एक प्रशस्त खिडकी आहे. साली उठाव तर हिरवळ घेऊन बहरली असते. उन्हात सावली देणारे गुलमोहर दाखवते. पलीकडे एक स्मशान आहे पण माझ्या खिडकीने मी फक्त चांगलंच बघावं म्हणून ते लपवून ठेवलं आहे. सुर्यास्त बघण्याची सवय आम्हाला या खिडकीने लावली आहे. विशेष म्हणजे खूप वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी आमच्या कडे आहेत. रोज संध्याकाळी परतणारे थवे बघायला मिळतातं. विस्तृत आकाश, बदलणारे ढग... ही खिडकी मला निराकाराबरोबर कनेक्ट करायला मदत करते. त्यामुळे ही खिडकी संत महात्म्यांसारखी आहे.
माणसांप्रमाणे वास्तूला पण स्वभाव असतात. बघायला आणि ऐकायला फुरसत मिळायला हवी.

खूप छान 👌👌
ReplyDeleteKhup sundar
Deleteखिड़की के द्वारा जीवन संस्मरण को सुंदर ढंग से लिखा है। मन के भाव के साथ खिड़की का व्यक्तित्व भी निखर कर आया है। सुंदर अभिव्यक्ति।
ReplyDeleteKharch khidkichi sundar kalpna.Mast
ReplyDeleteलिखाण म्हणजे नक्की काय असतं हे जर कोणाच्या मनात प्रश्न असेल तर अमृता जी ने लिहिलेलं हे लेख वाचावं, कारणं एखाद्या निर्जीव वस्तूला सुद्धा लेखणीने प्राण देता येतं . मला तर असेच दिसून आले. कल्पना सृष्टीला सुद्धा साकार रूप देणे सोप नसत. पण देवाने तुम्हाला ही कला दिलेली आहे. म्हणून असच लिहत रहा . तुम्हाला मराठी भाषेत कमेंट करू अशी इच्छा होती . माझ्याकडून हा छोटा सा प्रयत्न ✍️ keep Writing . Stay blessed . (Blessed Amruta Behna)
ReplyDeleteKhupch chan
ReplyDelete😍
ReplyDelete