पॉझिटिव्ह माणसांची खरी गोष्ट : विशाखा चव्हाण
सारी दुनिया एक तरफ़ है, एक तरफ़ है हम हर खुशी तो दूर भागे, मिल रहे हैं ग़म But when you smile for me the world seems alright ये मेरी ज़िन्दगी पल में ही खिल जाए, जाने क्यूँ दिल जानता है तू है, तो I'll be alright ही मला alright करणारी माझी सखी, मैत्रीण, छोटी बहीण, फॅमिली आणि बरंच काही असणारी माझी विशू.. एखाद्या समारंभामध्ये जर कोणीतरी - लहान - मोठ्या, ओळखीच्या किंवा नुकत्याच ओळख झालेल्या, बोलक्या किंवा अजिबात न बोलणाऱ्या, सुंदर किंवा बरे दिसणाऱ्या सगळ्याचं व्यक्तीं बरोबर selfie काढतांना दिसलं.. तर ती आहे विशाखा चव्हाण. माझ्या आणि संदेश साठी - विशू. विशूच्या सगळ्या कुटुंबाला मी माझ्या लहानपणापासुन ओळखते, पण लहानपणीची विशू मला आठवतचं नाही. पण गेल्या ८-९ वर्षां पासून विशू माझ्या फॅमिलीचा भाग नकळत बनून गेली आहे. मम्मीच्या ५०व्या वाढदिवसाला मी आणि ऋतीने - 'तू कितनी अच्छी है, ओ माँ... ' हे गाणं गायलं. मी आणि ऋतीने इमोशनल होणं साहजिकच होतं. पण बाजूला उभी राहून आमच्या सुरात सूर मिसळून विशू पण डोळे पुसत होती. इतकी विशू आमची होऊन गेली आहे. विशू आजच्या पिढीची आहे, त्यामुळे अवखळ असणं स...