गोरख न्हावी

आज LOCKDOWN च्या निमित्ताने आमच्या घरी केस कापायचा एक अध्याय पार पडला आहे आणि हा अध्याय मला परत एकदा मला आठवणी मधल्या एकलहऱ्याला घेऊन गेला आहे. इक्बाल मामा च्या बेकरीच्या बाजुला ४-५ दुकान सोडून गोरख न्हाव्याच दुकान होत. तिकडे आम्ही केस कापायला जायचो. मी आणि तुषारने  (माझा मामे भाऊ) ज्या अनेक गोष्टी CHILDHOOD ADVENTURE मध्ये केल्या आहेत, त्यात गोरख न्हाव्याने केलेला HAIRCUT पण होता. आमचे केस सारखेच वाढतात असं कोणीतरी म्हणायचे मग आम्हाला ५ रुपये देऊन गोरख न्हाव्याकडे पाठवलं जायचं. ५ रुपये एका HAIRCUT  चे होते की तुषार चे आणि माझे मिळुन हे मला सांगता येणार नाही.  मी आणि तुषार HAIRCUT ला एकटेच जायचो, इतकं INDEPENDANT आम्हाला तेव्हाच करण्यात आलेलं होती. गोरख न्हाव्याकडे जाण हे जत्रेमधल्या पाळण्या मध्ये बसण्या सारखं होतं. मज्जा पण यायची, जायचं पण असायचं आणि भिती पण वाटायची. गोरख न्हाव्याच्या दुकानात आकाशी रंगाच्या खुर्च्या होत्या. उंची वाढविण्या साठी एक गोलाकार उशी होती. त्याच्यावर बसायला खूप मज्जा यायची आणि HAIRCUT मधला हा एकदम EXCITED पार्ट होता. पण अशी एकाच उशी असल्यामुळे एका वेळी एकाच HAIRCUT व्हायचा. तुषार ने नेहमी मला प्राधान्य दिल्या मुळे मी आधी HAIRCUT ला बसायचे. समोर एक मोठा चकचकीत आरसा असायचा. मग तो स्प्रे घेऊन आपल्या केसांवर मारायचा म्हणजे EXCITEMENT डबल व्हायची. ( असा स्प्रे मला खेळायला मिळावा असं माझं लहानपणीच स्वप्न होतं. पुढे प्रमिला मावशीच्या गोदरेज च्या घरी गॅलरी मध्ये झाडांना पाणी घालण्याच्या निमित्ताने देवाने माझं स्वप्न पूर्ण केलं.)   

मग एक भीतीदायक गोष्ट घडायची. HAIRCUT करतांना थोडीशी मान हलवली की गोरख न्हावी म्हणायचा कि,'' तू हललीस तर तुझा कान कापला जाईल.'' मला इतकी भीती वाटायची की मी जीव मुठीत घेऊन हलायच नाही हलायच नाही असं सारखं मनात म्हणत राहायची. थोड्या वेळाने परत थोडी हलली की  गोरख न्हावी म्हणायचा की दोन्ही कान कापले गेले तर तुला ऐकायला येणार नाही. मला त्याचं बोलणं खुप खरं वाटायचं. 

मग तुषार HAIRCUT ला बसायचा. माझं हृदय अजुन जोरजोरात धडधडायला लागायचं. आपल्याला जसे कान आहेत तसेच कान आपल्या छोट्या भावाला पण राहायला पाहिजेत असं छोट्या अमुला वाटतं राहायचं!

Comments

Popular posts from this blog

ये इश्क, मुझे इश्क है तुमसे..

Radheshyam Ji Shraddhanjali

Satguru Babaji