पॉझिटिव्ह माणसांची खरी गोष्ट : ती (जिचं नावं मला माहीत नाही)
लग्न झाल्यानंतर मी आणि संदेश केरळला फिरायला गेलो होतो. मी संदेश च्या जितक्या प्रेमात पडले, तितक्याच केरळच्याही पडले. आणि परत एकदा केरळ बघायला जायचं असं मी मनात ठरवलेलं होत. जागु, सचिनजी आणि आम्ही एकत्र फिरायला जायचे प्लॅन करत असतांना, मी सगळे लोकशन्स कॅन्सल करून केरळलाच जाऊया असं सांगितलं. ऑक्टोबर मध्ये जायचं ठरलं
२ महिने आधी सगळे बुकिंग्स झालेले होते. काय शॉपिंग करायचीय आणि काय कुठे खायचंय हे पण ठरलेलं होतं. पण जायच्या १ दिवस आधी अदवितला (माझा मुलगा) ताप आला. आम्ही सकाळी रेग्युलर डॉक्टर कडे घेऊन गेलो. त्यांनी अजून २-३ दिवस बघा नाहीतर केरळ मध्ये ब्लड टेस्ट करून घ्या, असं सांगितलं. आम्ही केरळ ला पोहचलो आणि दोन दिवस फिरलो पण रात्रीचा येणारा ताप माझी आणि संदेश ची झोप उडवत होता. आम्ही असलेले मेडिसिन्स देतं होतो , बर्फाच्या पाण्याने sponging सगळं करत होतो. शेवटी तिसऱ्या दिवशी आम्ही टेकडी नावाच्या हिल स्टेशनला जायला निघालो. रस्त्यात एखादा child specialist असेल तर दाखवु असं ठरवुन निघालो. शंकेची पाल मनात चुकचुकत होतीच! रस्त्यात एक डॉक्टर भेटले. त्यांनी ब्लड टेस्ट करायला सांगितलं. ब्लड टेस्ट करणारीने अदवीतला यथेच्छ ४-५ ठिकाणी टोचलं. मी आई म्हणून एक्दम हतबल तेव्हा.. त्याला कसतरी शांत करून रिपोर्ट येई पर्यंतचे २ तास काढले. मग रिपोर्ट्स मध्ये प्लेटलेट्स कमी झालेत असं आलं. डॉक्टर काही नीट उत्तर देईनात, म्हणून मुंबई च्या डॉक्टरांना फोने केला. त्यांनी अदवितला immediatle ऍडमिट करा सांगितलं. अजून एखादा बरा paediatrition शोधला. त्याने तुम्ही कोचीनला जा इकडे उपचार होऊ शकणार नाहीत असं सांगितलं. पुन्हा एकदा मोठं प्रश्नचिन्ह उभं राहील. मग कोचीनचा प्रवास ४ तासांचा. दिवसभर काही न खाल्लेला अदवित! प्लेटलेट्स अचानक रस्त्यात कमी जास्त झाले तर काय होईल या भयाण विचाराने आम्ही सगळे पोखरून गेलेलो. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना काळाकुट्ट अंधार आणि जंगल.. मला इतकं आवडणारं केरळ अचानक मला भयानक वाटू लागलं. काही केल्या ते ४ तास काही सरेनात.. सिमरण करत रस्ता कापत होतो.
शेवटी एकदाचे कोचिनला पोहचलो. एका हॉस्पिटलने ''आम्ही ऍडमिट करून घेऊ शकत नाही कारण आमच्या कडे लहान मुलांसाठीचा ICU नाहीये'', असं सांगितलं. दुसरीकडे पाठवलं. (आपल्या मुलाला ICU मध्ये ठेवण्या इतकं काही तरी सिरीयस आहे, मग टेन्शन अजून वाढलं). सचिनजींनी तोपर्यँत, जो मोठा परिवार सत्गुरुने दिला आहे, त्यांना कॉल केला. रात्री १२-१ वाजता सावंतजी आणि त्यांच्या मिस्सेस कोणतीही ओळखं नसतांना, आमच्या साठी धावुन आले. दुसऱ्या हॉस्पिटल मध्ये गेलो तर तिकडे बेड available नाही असं कळलं. सावंतजीनी त्यांच्या परीने बरेच प्रयत्न केले. पण तरी काही होईना ...हे घडायला रात्रीचे २ वाजत आलेले होते. ३:१५ ची flight mobile वर दिसत होती. एअरपोर्ट त्या हॉस्पिटल पासून ४५ मिनिटांवर. म्हणजे तिकीट बुकिंग पासुन ते चेक इन् पर्यंत फक्त अर्धा तास. तरी निघालो. सचिन आणि जागूला आम्ही तो टूर जबरजस्ती पूर्ण करायला सांगितलं. आम्ही एअरपोर्टला पोहचलो तेव्हा जड मनाने आणि भरलेल्या डोळ्यांनी ते परत हॉटेल वर गेले. सगळ्या formalities complete करून flight मध्ये बसणार... तोच advit ला उलट्या सुरु.... सुदैवाने तो flight मध्ये शांत झोपला आणि मुंबई आली.
मुंबईची गरम हवा मला खूप आवडली तेव्हा. आपल्याला प्रदूषण असलेली, हीच हवा मानवते असं वाटून गेलं. airport वरून direct बेथनी हॉस्पिटल गाठलं. डॉक्टरांनी रिपोर्ट बघून लगेच ऍडमिट करायला सांगितलं. आम्ही होकारच दिला. मग त्याला casualty मधल्या बेड वर झोपवुन मला आणि संदेशला बाहेर पाठवून दिल. एकतर बाहेर उजाडलेलं नव्हतं. त्यात इतक्या मोठ्या कॉरिडॉर मध्ये कोणीच नाही. advit सकाळच्या ब्लड टेस्टिंग मुळे आधीच खूप घाबरलेला. त्याच्या जोरात रडण्याचा आवाज त्या रिकाम्या जागेत जास्तच घुमत होता. तो आवरला जात नसेल म्हणून अजून एक दोन जण आत पळाले. त्यात सकाळपासून संदेश ने धरून ठेवलेला धीर आत्ता सुटला. तो रडायला लागला हे बघून माझं अवसानच गळालं.
आणि मग ती भेटली..
मला डॉक्टरांनी बाहेर बसायला सांगितलं. ती आधीच होती की माझ्यासाठी पोहचली? मला खरचं माहीत नाही. मी ओक्सबोक्सी रडतं होते. तिने मला विचारलं,'' R u all right ??'' मी रडतचं मान हलवुन नाही सांगितलं. ''Do you want water?'' मी रडतच पुन्हा मान हलवुन नाही सांगितलं. ''Then you need a hug'' असं म्हणून तिने चक्क मला घट्ट मिठी मारली. खूप वेळ तिने पकडूनच ठेवलं मला. मग पाठ थोपटुन म्हणाली , ''Everything will be all right'' कदाचित त्या वेळी मला त्या मिठीची खूप गरज होती. मी थोडी शांत झाली असेन कदाचित, तोपर्यंत ती उठली समोरून मेडिकल मधून एक बिसलेरी माझ्या साठी घेऊन आली. मग म्हणाली, ''Dont cry. Preserve your energy for your kid. When he will be all right, you need much energy to manage him'' (रडू नकोस तुझी energy तुझा मुलगा जेव्हा बरा होऊन मस्ती करेल, तेव्हा साठी सांभाळुन ठेव.) डोळे मिचकावुन मला ती सांगत होती.
मी smile करून तिच्याकडे बघितलं. २०-२१ वर्षाची कॉलेज गोइंग गर्ल. knee length चा बर्मुडा, त्यावर एक comfertble T- shirt. सावळी होती. कुरळ्या केसांची. तिच्या कुणा friend च्या आई ची surgery होती म्हणून आलेली होती.
मग डॉक्टरांनी मला आत बोलावलं. advit च रडणं थांबल होतं पण हुंदके नाहीत. मग वॉर्ड मध्ये शिफ्ट केलं. ४-५ दिवसांनी advit बरा झाला. पण ते ४-५ दिवस तिने मिठी मारून दिलेला दिलासा - Everything will be all right, माझ्यासाठी कामाचा ठरला. तिला मी परत हॉस्पिटल मध्ये शोधलं पण ती परत सापडली नाही. ती कोण होती मला कळलं नाही. सत्गुरुच असावा! नाहीतर ओळख पाळख नसतांना ती त्या वेळी कशी आली ? माझा भार हलका करायला...
तिने मला खूप छान गोष्ट शिकवली. पहिली म्हणजे दुःख परक्यांचे पण वाटुन घेता येतं. बऱ्याच वेळा आपल्या पायाखालची जमीन सरकू लागते आणि आपणं आतून प्रचंड हादरलेले असतो. तेव्हा कोणीतरी घट्ट मिठी मारून सांगतं की पाय जमिनीत घट्ट रोवुन उभी रहा. वादळ आहे, निघुन जाईल. आणि काही वेळाने वादळं निघुन गेलेलं असत. मग वाटतं आपण उगीच इतके घाबरलो होतो.
कोरोनाच्या काळात प्रत्यक्ष मिठी आपल्याला कोणालाच मारता येणारं नाही. पण आपुलकी, दिलासा आणि उद्याची आशा, हे पण मिठी इतकंच काम करतील. आजुबाजुला लक्ष ठेवूया. कोणाच्या पायाखालची जमीन सरकत असेल तर, पाय रोवुन घट्ट उभं राहायला मदत करूया !! जग बनवणारा रोज नवी मुलं जन्माला घालतोय, (कॉरोना positive मातेला पण सुदृढ बाळ होतंय) बनवणाऱ्याने मानवतेवरची आशा सोडली नाहीये, आपण सोडून कशी चालेल!
Comments
Post a Comment