पॉझिटिव्ह माणसांची खरी गोष्ट : योग्या ( योगेश )
''तुम बेसहारा हो तो, किसी का सहारा बनो - तुमको अपने आप ही सहारा मिल जायेगा !! '' मला आत्ता हे गाणं ऐकतांना योग्या डोळ्या समोर येतो. १७-१८ वर्षांपूर्वी मला योग्या भेटला. बहिणीच्या नाटकाची तालीम बघायला गेले होते. हौशी कलाकारांच्या घोळक्यात मी पहिल्यांदा 'योग्या' ला भेटले. खरं नाव - योगेश बाविस्कर. त्या नाटकामध्ये त्याच काम सगळ्या कामांवर लक्ष ठेवणं हे आहे, अश्या attitude मध्ये हा होता. सगळ्यांना हसवणे आणि स्वतः हसत रहाणे हा छंद ! तेव्हा होता आणि आज ही आहे. काही वेळाने घरी जायला निघालो. मित्रांनी / मैत्रिणींनी त्याचा हात पकडून आळी पाळीने स्टेशन पर्यंत पोहचवलं. आणि त्या दिवशी मला योग्या बद्दल हे कळलं - योग्याला फक्त १ फूट अंतरावरच दिसतं. त्या पलीकडे त्याला दिसत नाही. त्याच्या आजार वाढत जाणार आहे, आणि हळूहळू त्याचं दिसणं बंद होईल. योग्याने मनाची तयारी खूप आधीच केलेली होती. त्यामुळे तो लढत राहिला. योग्या एकदम जिंदादिल माणूस आहे. तो कोणा बरोबर पण ओळख काढुन गप्पा मारू शकतो. आणि सगळे त्याचे फॅन्स आहेत, हे तो मला नेहमी सांगत असतो. हॉस्पिटल मधल्या नर्सेस पासून ते विकलांगा...