पॉझिटिव्ह माणसांची खरी गोष्ट : शशी आँटी जी आणि प्रकाश जोशी जी
आज प्रकाश जोशींची आणि शशी आँटी जी यांच्या लग्नाचा वाढदिवस. प्रत्येकाला आपापले हे दिवस खूप खास वाटत असतात. पण प्रकाशजींनी मला इतरांचे दिवस कसे खास कसे करायचे हे शिकवले आहे. आत्ता कुणी कुणाचे वाढदिवस लक्षात ठेवतं नाही, किंवा लक्षात ठेवायची गरज त्यांना भासतं नाही. फेसबुक किंवा वॉट्स अँप ओपन केलं की कोणाचा वाढदिवस आहे, लग्नाचा वाढदिवस आहे हे आपोआप कळतं. मग आपण हैप्पी बर्थडे आणि २-३ smileys पाठवल्या की आपण शुभेच्छा पाठवण्याचं कर्तव्य केलेलं असतं. (बरेच लोक तर वरचा मेसेज कॉपी करून खाली पेस्ट करून पण शुभेच्छा पाठवतात.) पण प्रकाशजींच्या शुभेच्छा खूप विशेष असतात. गेल्या २५-३० वर्षांत (जेव्हा फेसबुक आणि वॉट्स अँप remind करायला नव्हतं तेव्हा पासुन) प्रकाशजी माझ्या प्रत्येक वाढदिवसाला मला विश करतात. आणि फक्त मलाच नाही तर माझ्या घरातल्या प्रत्येक व्यक्तीला प्रकाशजींचा वाढदिवसाला फोन येतो. (माहेरी आणि सासरी सुद्धा ) मला त्यांचा फोन येत नाही तो पर्यंत वाढदिवस साजरा झाल्याचं समाधान मिळत नाही. एके वर्षी माझ्या वाढदिवसाला प्रकाशजी हिमाचल प्रदेश मध्ये टूर ला गेले होते, landline चा जमाना होता. फोन लागत नव्हता... पण शशी आँटी जीनी प्रकाशजींची जागा भरून काढली आणि मला शुभेच्छा पोहचवल्या.
एकदा पदमा मावशी आणि दादाला प्रकाशजींनी एका वाढदिवसाला जायचंय असं आमंत्रण दिल. एका अपंग छोट्या मुलीचा वाढदिवस. त्या दिवशी प्रकाशजी आमंत्रित नव्हते. पण त्या घरी कोणी शुभेच्छा द्यायला आणि साजरा करायला कोणी जाणार नाही. म्हणून प्रकाशजी सगळ्यांना सोबत घेऊन गेले होते.
शशी आँटी जी दुधात मिसळलेल्या साखरेसारख्या आहेत. त्या नेहमी दिसतीलच असं नाही, पण त्यांचा गोडवा जाणवतं राहतो. प्रकाशजी सतत सेवेत बुडालेले. सगळ्यांना भेटतं, motivate करत यांचं कार्य चालू असत. कोणामध्ये कोणते गुण आहेत त्यांना कसं अजुन छान करता येईल, यामध्ये प्रकाशजी सतत व्यस्त असतात. त्यांचं हे असं busy असणं खुप पूर्वी पासूनच आहे. आम्ही लहान होतो. मी आणि समता चेंबूर भवनला खेळत होतो. मग मी माझ्या परिवारासोबत अरुणा ताई च्या घरी निघुन गेले. थोड्या वेळाने तिकडे प्रकाशजी पण आले. आम्ही सगळे एकत्र जमलो, की मेहफील आपोआपच सजून जात असे. चर्चा चालू होती. आनंदाचे डोही आनंद तरंग असं सगळं झालं होतं. मग अचानक मला बघुन प्रकाशजींना आठवलं, की ते समता ला भवन वरचं विसरून आलेले आहेत. मग ते परत जाऊन समता ला घेऊन आले. ती पण मस्त होती. प्रकाशजींचं भक्ती मध्ये बुडुन जाणं हे असं आहे. मला माहित नाही हे घरी कळल्यावर शशी आँटी जी नी काय reaction दिली असेल. पण शशी आँटीनी या संत फकिराचा संसार जपलाय हे नक्की!
गुण पारखता येणे, हा प्रकाशजींचा गुणधर्म आहे.मी नववी मध्ये असतांना चेंबूर भवन ला प्रकाशजी भेटले. प्रकाशजींनी मला विचारलं की, '' तू लहानपणी एक दिलवरजींनी लिहिलेली कविता बोलून बाबाजींचा आशीर्वाद घेतला होता. ती कविता आठवते का??'' मला ती कविता अर्धी आठवत होती. मी अर्धी ऐकवली. काही प्रकाशजींना आठवत होती. आम्ही दोघांनी मिळून ती कविता म्हटली. आणि मी स्वतः लिहिलेल्या ४-५ ओळी प्रकाशजींना ऐकवल्या. आणि हे सगळं मी विसरून गेले. मग त्यांनी जानेवारी मध्ये एकदम आठवणीने दादा ला फोन केला. वार्षिक संत समागम च शीर्षक सांगून. अमृताला लिहायला सांग असं सांगितलं. दातार च्या कृपेने पहिली कविता लिहिली गेली. मी जेव्हा ती घरी वाचून दाखवली तेव्हा मी ती कुठून तरी बघून लिहिली आहे असं घरी सगळ्यांना वाटलं. त्यांना असं वाटणं साहजिकच होतं. मी जे लिहिलं होत त्यावर माझा विश्वास बसतं नव्हता. पण प्रकाशजींना तो सगळ्यात आधी वाटला. माझी प्रत्येक कविता सत्गुरुची ऋणी राहील आणि लेखणी प्रकाशजींना पण धन्यवाद म्हणतं राहील.
पुढे मी सीबीडी बेलापूर ला जॉब ला लागले. जवाबदाऱ्या बघता मला तो जॉब करणं खुप गरजेचं होत. तेव्हा मी राहायला नेरळला. म्हणजे दोन अडीच तास जायचे आणि दोन अडीच तास यायचे. दिवसांमधले ५ तास travelling सुरु होतं. कधी न संपणारा वर्क लोड. या सगळ्यात मला ऑफिस मधुन निघायला रात्रीचे ८-९ वाजायचे. पण एके दिवशी मला चक्क ११ वाजले. प्रकाशजी तेव्हा बेलापूरलाच राहायला होते. मी फोन केल्यावर १० मिनिटांच्या आत कर्तव्यदक्ष पित्यासारखे प्रकाशजी मला ऑफिस च्या खाली घ्यायला आले. मी प्रकाशजींच्या घरी पोहचले तेव्हा त्यांची सगळ्यांची जेवणं झाली होती. माझ्या साठी शशी आँटी नी पुन्हा एकदा जेवण बनवलं. working woman होत्या. पण चेहऱ्यावर एक आठी पण शशी आँटी जीनी आणली नाही. खूप सहज त्यांनी परत जेवण बनवलं. मग मला म्हणाल्या,'' इतना ट्रॅव्हल करने से तो अच्छा है की इधर हमारे घर ही रह जावो.'' प्रकाशजी म्हणाले,'' अग, माझ्या दोघी आहेत. तू आलीस तर तिसरी आली असं वाटेल मला.'' मला काही सुचलंच नाही. मी दर्शन घेऊन झोपायला गेले. सकाळी उठले तर शशी आँटी जी ७ वाजताच ऑफिस ला निघून गेल्या होत्या. पण टेबल वर माझा नाश्ता आणि मायेने बनवलेला डब्बा माझी वाट बघतं होता. त्या दिवसांनंतर मी तो कठीण जॉब माझं कोणीतरी खूप जवळ, हाकेच्या अंतरावर आहे.. या आशेवर केलाय.
आजपण मी समता आणि एकता ला बघते. दोघी पण independant आहेत. modern आहेत. पण नम्र आहेत. कोणतीच हवा डोक्यात न जात पाय जमिनीवरच आहेत. हे सगळ शशी आँटी जी आणि प्रकाशजींनी त्या दोघींमध्ये भरलय. नातीं पुढे पण हेच सगळे आदर्श ठेवत, जोशी पिताजींच्या छत्रछायेत.. प्रकाशजी आणि शशी आँटी जी अजून फुलत चालले आहेत. तुम्ही असेच फुलत राहा.


Comments
Post a Comment