पॉझिटिव्ह माणसांची खरी गोष्ट : विशाखा चव्हाण


सारी दुनिया एक तरफ़ है, एक तरफ़ है हम
हर खुशी तो दूर भागे, मिल रहे हैं ग़म
But when you smile for me
the world seems alright
ये मेरी ज़िन्दगी पल में ही खिल जाए,
जाने क्यूँ दिल जानता है
तू है, तो I'll be alright
ही मला alright करणारी माझी सखी, मैत्रीण, छोटी बहीण, फॅमिली आणि बरंच काही असणारी माझी विशू..
एखाद्या समारंभामध्ये जर कोणीतरी - लहान - मोठ्या, ओळखीच्या किंवा नुकत्याच ओळख झालेल्या, बोलक्या किंवा अजिबात न बोलणाऱ्या, सुंदर किंवा बरे दिसणाऱ्या सगळ्याचं व्यक्तीं बरोबर selfie काढतांना दिसलं.. तर ती आहे विशाखा चव्हाण. माझ्या आणि संदेश साठी - विशू.
विशूच्या सगळ्या कुटुंबाला मी माझ्या लहानपणापासुन ओळखते, पण लहानपणीची विशू मला आठवतचं नाही. पण गेल्या ८-९ वर्षां पासून विशू माझ्या फॅमिलीचा भाग नकळत बनून गेली आहे. मम्मीच्या ५०व्या वाढदिवसाला मी आणि ऋतीने - 'तू कितनी अच्छी है, ओ माँ... ' हे गाणं गायलं. मी आणि ऋतीने इमोशनल होणं साहजिकच होतं. पण बाजूला उभी राहून आमच्या सुरात सूर मिसळून विशू पण डोळे पुसत होती. इतकी विशू आमची होऊन गेली आहे.
विशू आजच्या पिढीची आहे, त्यामुळे अवखळ असणं स्वाभाविक आहे. ''आपण मज्जा करूया ना'' अश्या मूड मध्ये नेहमी असते. सकाळी १० वाजता तिला विचारा आज कुठे जाऊया? ती म्हणेल मरिन ड्राईव्हला. तुझ्या वाढदिवसाला कुठे जायचं? ती म्हणेल, मरिन ड्राईव्हला. रात्री २ वाजता पण तिला मरीन ड्राईव्हलाचं जायचं असतं. विशू मरीन ड्राईव्हला मुंबईचा स्वर्ग मानते.
सावळी आहे पण देखणी आहे. आत्मविश्वास आहे, पण अहंकारी नाही. बोलकी असल्यामुळे कुठेही मिसळुन जाते. मैत्री करते आणि मैत्री जीवापाड जपते पण!! मेहनती आहे. इंजिनियर आहे. आख्खा लोकडाऊनचा काळ मी घरी बसलेली असतांना विशू कटकट आणि तक्रार न करता ऑफिसला जात होती. ती जे करते ते निष्ठेने करते. विशू जे काही करते ते खूप प्रामाणिकपणे आणि जीव ओतून करते.
माणसांना जपणं, त्यांच्या आनंदात सहभागी होणं हा स्वभावाचा भाग आहे. त्यामुळे कोणाचंही लग्न, संगीत, डोहाळे जेवण, साखर पुडा, वाढदिवस असू द्या. तुम्ही परफॉर्म करायचं ठरवलं की, विशू ऑफिस मधून कितीही दमून आली आलेली असली तरी प्रॅक्टिसला येईल. Dj लागला की विशूला नाचायचं उधाण येतं. dj वाला थांबतो, पण विशू काही थांबत नाही. मग ती त्याला request करून अजून एक extra गाणं लावायला सांगते. समारंभ संपतो तेव्हा नखशिखांत घामात भिजुन विशू बाहेर पडलेली असते.
आपल्याला गरज लागली तर काही व्यक्ती हाकेच्या अंतरावर उभ्या असतात. विशू मी बोलवायच्या आधी हजर असते. ती अवखळ वाटत असली तरी ती जवाबदार आहे. ७-८ वर्षांपूर्वी मला lung infection झालं. दर ५- १० मिनिटांनी गरम पाणी प्यावंसं वाटायचं. पाणी प्याले की breathing नीट व्हायचे. मी स्वतः काहीही करायला असमर्थ होते. विशू कोणत्याही इन्व्हिटेशन शिवाय घरी येऊन राहिली. तिने किती वेळा पाणी गरम केलं असेल, त्याचा हिशोब नाही. जेवण बनवण्यापासुन भांडी घासण्यापर्यंत सगळ्या गोष्टींमध्ये तिने संदेशला मदत केली. माझ्या खोकल्याची तिला किळस आली नाही. त्या माझ्या आजारपणात जे विशूने केलं ती खरं तर तिची जवाबदारी नव्हती. पण हा सेवाभाव कदाचित विजय आणि विजया चव्हाणजीं कडुन तिच्यामध्ये आला आहे. विशूला नाती निभावता येतात.
एकदा आम्ही बराचं लांबचा प्रवास करून आलो. उशीर झाला म्हणून एका रेस्टॉरंट मध्ये जेवायला गेलो आणि शीतलचं ब्लड pressure डाउन झालं. काय करावं हे मला सुचायच्या आत विशूने उन्नतीला (शीतलच्या मुलीला)उचलून घेतलं. हातापायांना मसाज केला. लिंबू पाणी पाजलं. माझ्यापेक्षा जवळजवळ १० वर्ष लहान असून विशू मध्ये असा एकदा क्षण सांभाळायची जी समज आहे, त्यामुळे मी विशूच्या प्रेमात पडते. विशू कडून हे प्रसंगावधान शिकण्यासारखं आहे.
अद्वित (माझा मुलगा) झाल्यापासून जवळजवळ प्रत्येक विकेंडला विशू मला मदत करायला आलेली आहे. माझ्या नंतर जर अद्वित ला कोणाकडे सोपवु शकते तर ती विशाखा आहे. मी गेल्या ३ वर्षां मध्ये ज्या सेवा करू शकले, त्या फक्त विशू अद्वितला सांभाळून घेते म्हणून! माझ्या या सगळ्या पुण्याईची विशू वाटेकरी आहे.
मैत्रीण, छोटी बहीण या शब्दांच्या ज्या व्याख्या आहेत, त्या मध्ये विशू परफेक्ट आहे. काही नाती रक्ताची नसली तरी, जगणं सुलभ करतात. विशू तशी आहे.
Wishing you (कॅमेरा) DSLR and 'दिल का यार' this year!!




Comments

Popular posts from this blog

ये इश्क, मुझे इश्क है तुमसे..

Radheshyam Ji Shraddhanjali

Satguru Babaji