Radheshyam Ji Shraddhanjali
येणारा काळ, पिढ्या, श्रोते, प्रेमी
विचारतील मला..
राधेश्यामजी कोण होते?
मी असंख्य आठवणी,
कवटाळून सांगेन..
प्रखर होते, कणखर होते.
शब्दांची फुलमाळ होते,
शब्दांची तलवार होते.
जगात होते, पण जगाचे नव्हते
जर कोणाचे होते, तर फक्त सदगुरुचे होते.
ना निंदेचे ना घृणेचे, ना कौतुकाचे चाहते होते
समर्पित होऊन गुरुचरणी, फक्त भक्तीमध्ये वाहते होते.
स्पष्ट होते, सरळ होते.. मुक्तछंदी दरवळ होते
कवी सभेचा जीव होते.. पण बऱ्याचदा राखीव होते.
राधेश्यामजी होते, आहेत आणि राहतील..
कविता, शब्द, गझल त्यांना गुणगुणत राहतील
कारण..
भरून निघणार नाही अशी,
मंचावरची जागा राधेश्यामजी आहेत.
माझी कविता उडेल तेव्हा,
योग्य दिशा राधेश्याम जी आहेत.
मेहफिलीतून इतकं अलगद,
उठून जातं का कुणी?
अश्रूंबरोबर जी कृतज्ञता वाहतेय,
त्या प्रत्येक थेंबात,
राधेश्याम जी आहेत.
अमृता
९ एप्रिल २०२१

We were Fortunate to be a part of his era ♥️🙏
ReplyDelete