पॉझिटिव्ह माणसांची खरी गोष्ट : वर्षा ताई

परिस्थितीच्या धगी मध्ये तावून सुलाखुन निघाल्यावर काही माणसं सोन्या सारखी चमकु लागतात, तशी 'वर्षा ताई' आहे.

सावळी तरी उज्ज्वल, बेताची उंची, सगळ्या संकटांवर मात करून त्यांना smile मध्ये सामावण्याचं सामर्थ्य... खुप stylish नसली तरी नेटनेटकी आहे. नुसती चालतं नाही, डोलतं चालते. तिच्या मध्ये एक लगबग आहे. सतत ट्रेन पकडायला निघाल्यासारखी स्पीड मध्ये असते. डोक्यात अनेक एका वेळी अनेक गोष्टी असतात. सहजता तिच्या स्वभावाचा असा भाग आहे, जो मला खुप भावतो ! वर्षा ताई माझी सख्खी नाही पण, आमच्या मध्ये जे आहे त्याला 'सख्खेपण' म्हणतात.

२ महिन्यांपूर्वी भारत आणि रशिया मध्ये एक करार झाला. भारताची representative म्हणुन ताई त्या करारावर singature करायला गेली. वर्षा ताई RBI मध्ये काम करून RBI चं भलं करते आहे. पण कुठलाही बडेजाव नाही. पदाचा अहंकार नाही. हल्ली कॉर्पोरेट मध्ये attitude या शब्दाखाली जो arrogance दाखवला जातो, त्याचा स्पर्श ताईला झालेला नाहीये. मी excited होऊन फोन केला तर मला म्हणाली की, ''RBI ने ठरवलं की कोणी पण जाऊ शकतं, इतकं काही खास नाही.'' मी म्हटलं की,'' तुला RBI रशिया पाठवतयं ना..मला तर कोणी रत्नागिरी ला पण पाठवणार नाही.'' मग ती छान खळखळुन हसते, तशी हसली.

मी ताईला पहिल्यांदा भेटले तेव्हा मी शाळेत आणि ताई इंजिनीअरिंग करत होती. engineers अनेक आहेत पण, एका भयाण परिस्थिती मध्ये मार्ग काढत ताई engineer बनतं होती. ताई आणि तिची ३ लहान भावंडे, आई वडील भांडुपच्या बैठ्या चाळीत राहत होते. पण त्या घरात भक्ती, सेवाभाव आणि विश्वास ठासुन भरलेला होता. ताई १०वीला असतांना तिच्या वडीलांना पॅरालीसीस चा अटॅक आला. घरातली कर्ती व्यक्ती घरात बसली आणि आईच्या अपार कष्टांना सुरवात झाली. मुलं आईच्या कष्टांना सहाय्यक झाली. त्याचं वर्षी ताई ९० टक्क्यांनी पास झाली. १२वीला गेली तर फी भरायला पैसे नाहीत.. समाजाने १००- १०० रुपये करून जमवलेल्या पैश्यांमध्ये ताई १२वी झाली. मुलींनी शिकुन काय करायचंय? गावी राहायला जा.. आर्टस् ला जा.. असे अनेक सल्ले येत होते. ताई आणि तिच्या आईने कंबर कसली. आईने सुक्की मच्छी ते साड्या विकण्या पर्यंतचे सगळे उद्योग केले... आणि VJTI सारख्या इन्स्टिटयूट मधुन ताई engineer झाली. काही महिन्यात ताई RBI मध्ये कामाला लागली. आई वडिलांना केलेल्या कष्टाचं सार्थक होत असल्याचं वाटू लागलं होतं. घरात ताईचा आदर्श घेऊन बाकी भावंड शिकातचं होती.आत्ता कुठे गाडी रुळावर येतेय असं वाटतं असतांना, आई आजारी पडली. ऍम्ब्युलन्स मधुन ताई आईला घेऊन हॉस्पिटल मध्ये जायला निघाली ''सत्संग आणि सत्गुरू आयुष्यात खुप महत्वाचे आहेत, त्याच्या शिवाय आपलयाला पर्याय नाही'' हा सल्ला आईने दिला. पण तो शेवटचा असेल हे ताईला वाटलंच नव्हतं. इतक्या अलगद आई निघून गेली. घरात शिकणारी भावंडं, आजारी वडील, नुकतीच आई गेल्याने झालेला आघात... यातुन सावरत असतांना, वडिलांना तिसरा अटॅक आला. नशीब बलवत्तर म्हणून बाबा मुलांना आशीर्वाद दयायला वाचले. लहान भावंडांना जीव लावतं ताई पासून ती सहज त्या घराची 'आई' होऊन गेली.

ताईच्या लग्नाची वेळ आली तेव्हा तिच्या स्वतंत्र, जवाबदार, कर्तव्यनिष्ठ असण्यापेक्षा तिला तिच्या दिसण्यावरून नाकारण्यात आलं. शेवटी तिच्या असण्यावर प्रेम करणारे जीजू आम्हाला भेटले. ती त्यांची mentor असली तरी तिने वरणाची फोडणी improve करावं असं जीजुंना वाटतं. आम्ही आधी त्यांच्या घरी रहायला जायचा प्लॅन करतो, नंतर त्यांना आम्ही येणार असल्याचं इन्फॉर्म करतो. परकेपणाचं अंतर त्यांनी काढुन टाकलेलं आहे. जीजू खूप वर्षांपासुन आमच्या मधलेचं होते, असे मिसळुन गेले आहेत.

खरं तर ताईला (आणि तिच्या भावंडांना ) परिस्थितीने इतके झटके दिले आहेत की आत्ता यापेक्षा जास्त वाईट होऊ शकतं नाही, असं वाटून ती सहज आणि स्थिर झाली आहे. खूप खाच - खळग्यांमधुन गेल्यावर नदी नितळ होते, तशी ताई झालेली आहे. तिच्या समोर कुणी कोणताही प्रॉब्लेम घेऊन जा, ती तुम्हाला त्या प्रॉब्लेम कडे बघायचा एक वेगळा दृष्टिकोन देते. अचानक आपण किती नशीबवान आहोत, हे वाटून माणूस पॉझिटिव्ह होऊन जातो.

आज ताईची सगळी भावंडं देशविदेशात शिकुन नीट सेटल आहेत. पण ताई त्यांच्या बद्दल बोलते तेव्हा ती भावा बहिणीपेक्षा स्वतःच्या मुलांबद्दल बोलतेय असं कौतुक तिच्या शब्दानं मधून वाहत असतं. सगळं काही असतांना 'आई-बाबा' हे बघायला नाहीत हा सल तिच्या मनात असतो. मग ती डोळ्यांच्या कडांमध्ये आलेलं पाणी लपवते.. आणि भावंडांबद्दल बोलत राहते. जेव्हढं प्रेम भावंडांवर तेव्हढाच वहिन्यांवर.. तिची मोठी शामल वाहिनी. (श्रीयुत गंगाधर टिपरे मध्ये शेखरची शामल होती. म्हणून शेखर दादाने वाहिनीचं नाव लग्नानंतर 'शामल' ठेवलं. ही शामल वाहिनी पण सगळ्यांसाठी करणारी आणि धडपडणारी आहे.) वर्षा ताई चे वडील आजारी असतांना वाहिनीने खुप सेवा केली. '' मी शामलचे पाय धुवून प्याले तरी कमी आहे, इतकी सेवा शामल ने बाबांची केली आहे'' या शब्दात ताईने शामल वाहिनी माझ्या समोर वर्णिली आहे. छोटी मेधा वाहिनी कशी लंगर बनवते, आफ्रिकेत सत्संग मध्ये सेवा करते..हे ताई कडूनच ऐकावं.

RBI ने बदल्या करत करत ताईला अनेक शहरं दाखवली. प्रत्येक वेळी नवीन जागी घर वसवण्यापासून ते सोहम च्या ऍडमिशन पर्यंत ही superwoman सगळं मस्त manage करतं आली आहे. सहजता तिच्या स्वभावाचा भाग असल्यामुळे तिला हे सहज जमतं. आम्ही गेली अनेक वर्ष ताईची बदली मुंबई ला व्हावी म्हणून प्रार्थना करत होतो. मागे तिची posting कानपूरला होती. तिकडच्या सत्संग मधल्या एका परिवाराबद्दल ताई नेहमी सांगायची की, ते सगळे आईची माया देतात. ताई कानपुर वरून निघाली तेव्हा त्या परिवाराने तिचा निरोप घेतांना तिला एक गिफ्ट बॉक्स दिला. गडबडीत तिला तो बघता आला नाही. घरी आल्यावर तिने तो बॉक्स उघडून मला फोन केला. तिचा आवाज भरलेला. ती आत्ता मुंबई ला येण्याच्या आनंदात असतांना अचानक काय झालं, हे मला कळेना. मग तिने मला २ फोटोस वॉट्स अँप केले. त्या बॉक्स मध्ये एक साडी होती. एकदम तशीच साडी जशी ताईच्या आई कडे होती, exact colours अँड प्रिंट्स.. ती साडी ताईने तिच्या साडी डे ला पण घातली होती. आणि आई बरोबर अंतिम क्षणी तीच साडी दिली होती. त्या दिवशी ताई च्या शब्दात सत्गुरुसाठी कृतज्ञता आणि आई ने सांगितलेली शिकवण होती,'' सत्संग आणि सत्गुरू शिवाय आयुष्यात पर्याय नाही.'' काही दिवसांनी मला एक function ला जायचं म्हणून मी ताईला एक साडी घेऊन चेंबूरला ये असं सांगितलं. ( तिच्याकडे साड्यांचं अफाट कलेक्शन आहे, आणि ती कपाट उघडुन 'पाहिजे त्या आणि पाहिजे तितक्या घेऊन जा' असं नेहमी सांगते ) ताई चक्क ती तिची special गिफ्ट वाली कोरी साडी घेऊन आली होती. मला म्हणाली, ''तू घडी मोड'' मला २ मिनीट काही सुचेना. खूप सहज तिने तिच्या आईची माया मला दिली आहे. आपल्या मौल्यवान गोष्टी share करायला मन मोठं लागतं, ते ताईचं आहे.

वस्तूंसारखं भावना जपून ठेवणं कोणी तिच्या कडून शिकावं. मला १० वर्षांपूर्वी संदेश बघायला आला आणि मला आवडला. पण माझ्या समोर असंख्य प्रश्न होते. लग्न करायलाचं पाहिजे का? मला जमेल का? फॅमिली मध्ये मला एड्जस्ट करता येईल का? हे मी आणि ताईने gmail chat केलं होत.तिने तू कर, सगळं नीट होईल वगैरे समजावलं होतं. आज लग्नाला १० वर्ष पूर्ण होत आली आहेत आणि ताईने पुन्हा एकदा ते सेम chat share केलं. इतक्या हसलो आम्ही पुन्हा एकदा ते सगळं आठवून... आमच्या भोवतीच सगळं जग बदलयं. पण ताई तशीच आहे.

आज ती लाखोंमध्ये कमवत असली तरी तिने (आणि तिच्या भावंडांनी) भांडुपच घर कधीच विकायचं नाही असं ठरवलंय. ताई म्हणते, ''सत्गुरुने कुठून कुठे पोहचवलंय, हे लक्षात राहावं. म्हणून ते घर ठेवायचंय.'' त्या घरातल्या आई वडिलांनी जी श्रद्धा, भक्ती आणि विश्वास भरला होता. तो ताई मधुन मी अनुभवत राहते. तुटलेले धागे तिला मिळाले होते. पण जोडून तिने विणत विणत सगळं सुंदर आणि सहज केलं आहे. म्हणुन 'वर्षा ताई' जगातली सगळ्यात 'सुंदर' ताई आहे!







Comments

  1. Its very very very difficult to present her in words....You should plan of writing a book on her.

    She is not only the 'Best Tai' She is the Best human being I have ever met...Jagatalya vaitatalya vait vyaktila pan ti positive side dakhavu shakte aani tyacha drushtikon badlu shakte.

    Very well written...pan ti vyaktich evadhi 'Asami' aahe ki tila asa shabdat bandhan khup avaghad aahe...

    Love you Tai...Thanks for making us part of your life...

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

ये इश्क, मुझे इश्क है तुमसे..

Radheshyam Ji Shraddhanjali

Satguru Babaji