मी, माझे चुकलेले पदार्थ आणि पचवणारे
बाई (माझी आज्जी )खानावळ चालवायची. ती अन्नपूर्णाच होती. तिचा वारसा जपत माझी मम्मी, मावश्या, मामा, माम्या सगळेच चविष्ट जेवण बनवतात. मग तो वारसा आपोआपच माझ्या भावंडांमध्ये आला आहे. पण घरात सगळे चांगले जेवण बनवत असतांना आपण कशाला उगीच किचन मध्ये जाउन लुडबुड करायची, असा विचार करुन मी बरेच वर्ष जेवण बनवण्या पासून दूर राहिले आहे. मी नववी दहावी मध्ये असतांना घरातील इतरांच्या आग्रहा खातर मी चपाती बनवायला किचन मधे गेले. वैशु ताई आणि आशीष जीजू यांच्या लग्नाची शॉपिंग चालू असतांना मी नालासोपाराला घरी चपात्या बनवल्या. मी खुप कौतुकाने कश्या झाल्या विचारल्या वर जीजुन्नी खुप छान अस उत्तर दिल आणि आजोबांनी वातडया होत्या अस खरं उत्तर दिलं. (त्या दिवसापासून आशीष जीजू खुप सहनशील आणि समजूतदार जावाई आहेत अशी माझी खात्री झाली आहे.)
त्यांनंतर मी संजीव कपूर ला फॉलो केल. त्याने अंडे उकडून त्यावर बटाटयाचे सारण लाउन त्यांना cornflour लाउन तळले होते. मी मात्र 3-4 iteams च सारण एकाच अंड़याला लावल्या मुळे पहिला iteam अर्धी कढ़ाई तेला मध्ये जोरजोरत आवाज करुन फुटला. मग मला रडू फुटल. नीमा मावशी, प्रीतम वाहिनी आणि मनीष दादा ला हसु फुटल. मग वाहिनीनी काहीतरी करुन तो पदार्थ बारा केला. भावेश दादाने खूपच मस्त झाला आहे अस म्हणून खाल्ला.
एकदा मनीष दादा च पोट खुप बिघडलं. तो खुप विचार करत होता की मी तर बाहेर काहीच खाल्ल नाहीये तरी माझ पोट का बिघडलय. मग मी त्याला प्रामाणिकपणे काल तू (आणि तु एकट्यानेच ) मी बनवलेली संजीव कपूर ची receipe खाल्लीस ना ! अस कबूल केल. मग माझा गुन्हा लपवत बिचारा दादा पोट साफ करायला गेला.
सोनाली वाहिनी माझ्या सारखी लग्ना नंतर जेवण बनवायला शिकलेली त्यामुळे मी कॉलेज मध्ये असतांना कांदा कापला तरी तिला कौतुक वाटायच. मला फ़क्त तिच्याच घरी आपल्याला जेवण येत असा कॉन्फिडेंस यायचा.
मग मी जेवण बनवण्याचा नादच सोडून दिला. रुतिने तर 'ब्रेज्ड उबारगायीनस' नावाच्या रेसिपी स्टडीने जेवण बनवायची सुरवात केली. मी आपल्याला जमनारच नाही तर कशाला रिस्क म्हणून विषयच सोडून दिला.
मम्मी ला तर माझ सासरी कस होईल अस वाटत राहायचं. म्हणून माझ्या लग्नाच्या बोलणीत, मम्मी इतर कोणतीही माहिती द्यायच्या आधी, मला काहीच बनवता येत नाही हे सांगितलं. लग्न ठरल्या वर मी भीति पोटी किचन मधे जरा येऊ जाऊ लागले. पण मम्मीला मला तस बघायची सवय नसल्यामुळे तिला माझी दया येऊ लागली. त्यात मी एके दिवशी हात चांगलाच भाजून घेतला. मग माझ सासरी काही खरं नाही, अशी सगळ्यांची माझ्या बाबतीत खात्री झाली.
मग माझ लग्न झालं. नवीनचं होत सगळ.. बामुगडेंच्या घरी कपडे कपड्यांच्या ब्रशने न धुवता, भांडी घासायच्या घासणीने घासतात असं मला कळलं. त्यामुळे कपद्यांना गोळे येत नाहीत अस समजलं. थोड्या वेळाने आईनी माझ्याशी गप्पा मारता मारता बाटल्या साफ करायचा ब्रश ड्रॉवर मधून काढला. आणि रवि समजून वरणामध्ये घालणार तितक्यात म्हणाल्या,''अग बाई हा तर बाटल्या साफ करायचा ब्रश आहे. मला सांगयच तरी तु..''
मी म्हणाले मला वाटलं, आपल्या कड़े पद्धत असेल.
2-4 दिवसांनी मम्मी चा फ़ोन आला म्हणाली, "काय करतेय?? " मी म्हटलं, नारळ खवतेय.
तिला परत टेंशन..म्हणाली येत का तुला? मी म्हटलं , ''शिकतेय.'' असं शिकत शिकत आज ९-१० वर्ष लग्नानंतर संसार राखला आहे.
मग मी महिन्या भरात जेवण बनवायला शिकले. आत्ता नीमा मावशीला जेवायला बोलावलं की तिला माझा खुप अभिमान वाटतो, की वाह ! पोरगी इतकं शिकली. मम्मीला अजुन पण शंशय आहेच, की मला जेवण बनवाता येत की नाही. मी इतर सगळ्यांचा पाहुणचार चांगला करते. पण दादा, वहिनी आले की नेमकं मला अजूनही काही सुचतं नाही. मनीष दादा सोनाली वाहिनी ला वाटत की मी चांगली कुक आहे. रुतिला मी खुप कमी वैरायटी बनवते पण मला खायची आवड नाही, अस वाटतं.
खरं उत्तर फ़क्त संदेशलाच माहित आहे. तो म्हणतो की मी छान बनवते. Lockdown मध्ये तो 'वाईट' म्हणायची रिस्क पण घेऊ शकत नाही.

Nice....
ReplyDelete