पॉसिटीव्ह माणसांची खरी गोष्ट : आई

अनेक नाती जगतांना भेटतात. जिव्हाळ्याने जपली तर दूरपर्यंत साथ निभावतात. पण एक नातं जे नेहमी बदनामच राहतं, पण माझ्या साठी पुण्याई घेऊन आलं. सासू सुनेचं नातं. जर जगात बेस्ट सासू अवॉर्ड कंपेटिशन असेल तर मी आईना nominate करू शकते. नाव - अरुणा बामुगडे. शिक्षण फारसं नाही पण मॉडर्न आहेत विचारांनी. कमालीच्या देखण्या आहेत, चेहऱ्यानेच नाही तर मनानेही !
सतगुरु वर पूर्ण विश्वास आणि आध्यात्मिकता नसा नसात भिनलेली, सतगुरू पेक्षा दुसऱ्या कशालाही प्रायॉरीटी आजपर्यंत दिलेली नाहीये यांनी, म्हणून त्या जगापेक्षा वेगळ्या सासू आहेत. सासू म्हणून insecurity, मुलावर गाजवणारा हक्क या पैकी कोणताही typical सासु गुण त्यांच्या ठायी नाही. मी लग्न करून या घरी आले तेव्हा मला जेवणातलं काही बनवता येत नाही म्हणून त्या कदाचित थोड्या नाराज असतीलही, पण त्यांनी ते मला कधीही जाणवु दिल नाही. मी अळणी, खारट,कच्च पक्क जे काही बनवलं, ते त्यांनी आवडीनं खाल्लं. तू शिकते आहेस ना मग हरकत नाही, असं म्हणत राहिल्या मग मी महिन्या भरात स्वयंपाक शिकले. आईंनी प्रत्येक पदार्थाचं तोंड भरून कौतुकच केलं. त्यांचं आणि माझं कामाचं timetable कधी जमलंच नाही. पण आम्ही तेव्हढी एक गोष्ट एकमेकींची ignore करत आलो आहोत. माणुसकीला आई नेहमी जागरूक आहेत. कॉरोनाने सफाई कामगारांचं महत्व आपल्याला समजावलं. पण ही गोष्ट इम्पलिमेन्ट करतांना मी आईंना खूप वर्ष आधी पासून पाहिलंय. दिवाळीला सफाई कामगार दिवाळी मागायला येतात अशी परंपरा आहे. त्यांना पैसे आणि फराळ (बऱ्याच वेळा उरलेला) देतो हे मला माहित होतं. पण या घरातले rules वेगळे होते. आमच्या कडे कचऱ्यावाल्या काकांना आदराने घरात बोलावलं जात. त्यांना खुर्ची वर आदराने बसवुन मग दिवाळी दिली जाते. एखादा कपडाही सत्कार केल्या सारखा खांद्यावर टाकुन दिला जातो. या सगळ्या गोष्टी त्यांनी बोलण्यापेक्षा करून दाखवल्या म्हणून त्या जास्त रुजल्या असं वाटतं. जगण्याच्या चढ उतारत नेहमी हसतं राहतात. कोणी दुखावलं तरी लगेच माफ करून टाकण्याइतकं मन मोठं आहे. आणि हे मी आईंना नेहमी करतांना पाहिलं. गुरुवंदनाच्या मंचा वरून राजू दादांना आपण सगळ्यांनी खुप हसवतांना पाहिलं, मला वाटतं हे गुण त्यांच्या मध्ये आईंमुळे आले आहेत.
६-७ वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. आमचं लालबागचं एका खोलीचं घर होतं. आम्ही माळ्यावर झोपायचो. आई अण्णा नेहमी प्रमाणे टूर वर होते. रात्री बहुतेक उशिरा आले असतील. मी सकाळी उठून खाली आले तर घरात कोणी तरी अनोळखी बाई बसलेली. मी चरण स्पर्श करायला गेले. वाटलं, सत्संगच्या परिवारातल्या कोणीतरी असतील. पण बाईंनी पाय मागे घेतले. नमस्कार करणे सत्संग मध्ये खूप अंगवळणी पडलेले आहे. पण बाई सत्संग परिवारातीलही नाहीत इतकं मला कळलं. मी प्रश्नार्थक नजरेने आईकडे बघितले तर त्यांनी 'तुला नंतर सांगते' इतका इशारा केला. सकाळी ७ वाजता घरी आलेली बाई कोण हे काही मला कळेना. नातेवाईक पण नव्हतीच. मग ९ वाजताच्या आसपास आई अण्णानी तिचं कोणा बरोबर तरी फोन वर बोलणं करून दिलं . ५० रुपये दिले आणि ती गेली. मग मला कळलेला खुलासा असा... रात्री शेवटची ट्रेन आई अण्णा नी ulhasnagar स्टेशन वरून पकडली. तेव्हा या बाईना जाळून टाकण्यासाठी तिची सासु तिच्या मागे धावत होती. नवरा night शिफ्ट ला ऑफिसला गेलेला. ती जीव वाचवण्यासाठी ट्रेन मध्ये चढली. तिचे मामा वरळीला राहत होते, तिकडे जायचा तिने विचार केला. पण इतक्या रात्री दादर वरून ती वरळीला एकटी कशी जाणार म्हणून आई अण्णा तिला घरी घेऊन आले . सकाळी ती मामा आणि नवऱ्याकडे गेली. खूप practically विचार केला तर, मी हे एका अनोळखी व्यक्तीसाठी कधीच केलं नसतं. पण त्यांचा चांगुलपणा वर कमालीचा विश्वास आहे. 'तेरा रूप है ये संसार' हे करणं त्यांना जमलं आहे.

लालबाग च्या चाळीत सुन म्हणून ज्या नजरेनं बघितलं जात, त्यात आईनी मला अडकवलं नाही. हे घालु नकोस, ते घालु नकोस, आमच्या कडे ही पद्धत नाही, असे कुठलेच बुरसटलेले विचार आईंनी माझ्या वर लादले नाहीत. आम्ही ठाण्याला फ्लॅट घेण्याचा निर्णय घेतला. त्यांनी त्यांच्या कडून 'लालबाग सुटणार नाही, पण तुम्ही जा' हे खूप सहज स्वीकारलं. कोणताही इमोशनल drama आईनी केला नाही. माझ्या ठाण्याच्या घरात सामान लावुन मग आई लालबागला परतल्या. मी जर मला त्यांच्या जागी ठेवलं तर, हे इतक्या सहज मला कधीच जमलं नसतं. आजही वयाच्या ७०व्या वर्षी घरातली सगळी कामं त्या कोणत्याही कामवाली शिवाय करत आहेत. आई अण्णांच्या जिव्हाळ्यामुळे घरातली येणाऱ्या जाणाऱ्यांची वर्दळ आजही कमी झालेली नाही. (कोरोना मुले pause आहे थोडा) वयोमानानुसार अनेक दुखणी पाठी लागली आहेत. पण ही सगळी दुखणी आपल्या हसण्या मागे लपवुन ही माता अण्णा बामुगडें च्या घराची खिंड लढवतेय.
आई सदाबहार आहेत आणि राहोत हीच दातार चरणी प्रार्थना!

Comments

Popular posts from this blog

ये इश्क, मुझे इश्क है तुमसे..

Radheshyam Ji Shraddhanjali

Satguru Babaji